दोन लाखांच्या लोनसाठी घातली एक लाखाची टोपी : फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

0

(वेब टीम)

मायक्रो फायनान्स मधून दोन लाखाचे लोन मंजूर करून देतो म्हणुन, ऑनलाईन पध्दतीने सोलापुरातील दांम्पत्यास १ लाख २ हजार ८00 रूपयाची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

विजयकुमार (रा. बेंगलोर) याच्यावर जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी विजय नारायण दोरनाल (वय-४२ रा. १0२/डी/१0५ घोंगडे वस्ती, भवानी पेठ) यांच्या मोबाईलवर १0 जुन २0१८ रोजी विजयकुमारने फोन करून मायक्रो फायनान्स मधुन दोन लाखाचे लोन मंजूर करतो असे सांगितले.त्या बदल्यात कर्ज मंजुरी साठी वेगवेगळ्या कारणास्तव १ लाख २ हजार ८00 रूपये वेगवेगळ्या बँक अकौंट नंबरवर भरून घेतले. पैसे भरूनही कर्ज मिळत नसल्याने विजय दोरनाल यांनी आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी मागणी केली असता फोन उचलण्याचे बंद झाले आहे. असे फिर्यादीत नमूद केले आहे.पुढील तपास सपोनि भुसनूर करीत आहेत़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here