Breaking | सोलापुरात रात्रीची संचारबंदी; शाळा, महाविद्यालय बाबत असा झाला निर्णय…

0

महेश हणमे /9890440480

सोलापुरातील विशेष करून ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता सोलापूर शहर व जिल्ह्यात आज २४ फेब्रुवारीपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. अशी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज बुधवारी दुपारी सोलापुरातील पत्रकार परिषदेत केली.

रात्र संचारबंदी ७ मार्चपर्यंत असणार आहे. याशिवाय ७ मार्चपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे…

आजपासून सोलापुरात 7 मार्चपर्यंत कडक रात्र संचारबंदी

आज मध्यरात्रीपासून रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी

– कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहर आणि
जिल्ह्यातील टेस्टींग वाढविणार
शाळा-महाविद्यालय 7 मार्चपर्यंत बंद राहणार

– 10 वी आणि 12 चे वर्ग सुरु राहणार

क्रीडांगणावर येत्या 7 मार्चपर्यंत कोणत्याही क्रीडा स्पर्धा

भरवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

– लग्नसमारंभासाठी 50 लोकांची मर्यादा

– कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड सेंटर वाढविणार

– कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना कोव्हिड निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 57405 वर पोहोचली आहे. तर, 54786 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1838 वर पोहोचलीय. सोलापूरमध्ये सध्या 732 सक्रिया कोरोना रुग्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here