Breaking -पी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त ; दीपक तावरे यांची बदली

0

MH13 NEWS Network

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठ्या प्रमाणावर महामारी चा संसर्ग होत आहे आज या संदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पत्रकार परिषद संपत असतानाच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांची बदली झाल्याचा आदेश काढण्यात आला तर त्या जागी राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सिवा शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना साथीवर नियंत्रण आणण्यात तावरे यांना अपयश आले होते. त्याचा फटका बसला असून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत हि मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात होती. जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत मोठ्या प्रमाणावर सोलापूरकरांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात असल्याने हा निर्णय घेतला गेला असल्याचे दिसून येत आहे.

शासनाने जो निर्णय दिला आहे तो सर्वतोपरी मान्य आहे .कोव्हीड नियंत्रण करण्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा दिवस-रात्र काम करत होती. शहरातील सर्व कंटेनमेंट झोन मधील वाढणारी रुग्णांची संख्या रोखण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले असल्याची प्रतिक्रिया सोलापूर महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांनी MH13 News सोबत बोलताना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here