BREAKING | देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

0

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती आणखी खालावली असल्याची माहिती लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयाकडून सोमवारी देण्यात आली होती. मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संक्रमण झाले होते. गेल्या कित्येक दिवसांपासून ते कोमामध्ये होते. रविवारी सायंकाळपासून मुखर्जी यांची प्रकृती जास्त खराब झाली होती.

तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मुखर्जी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. 2012 ते 2017 या काळात देशाचे 13 वे राष्ट्रपती राहिलेल्या 84 वर्षीय मुखर्जी यांची तब्येत 10 ऑगस्ट रोजी बिघडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच्या एक दिवस आधीच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मेंदूत झालेल्या गुठळ्या काढण्यासाठी करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर मुखर्जी कोमात गेले होते. त्यानंतर ते शुद्धीत आले नाहीत.

प्रणव मुखर्जी हे भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी कॉंग्रेस पक्षामधून राजीनामा दिला.भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार दिला. भारत सरकारने ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here