Breaking | CCH scam | संशयित आरोपींची मुंबई उच्च न्यायालयातून माघार
सोलापुरात मोठ्या प्रमाणावर गाजलेल्या CCH Scam प्रकरणी संशयित आरोपी अनंत येरमकोल्लू, जयंता येरमकोल्लू आणि एक महिला सदस्य यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला होता. परंतु आज गुरुवारी दिनांक पाच जानेवारी रोजी आरोपींच्या वकिलांनी अटकपूर्वक जामिनीचा अर्ज मागे घेतला असल्याचे सांगितले.
संपूर्ण शहरात या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली होती.मॅक्सक्रिप्टो प्रमाणेच या मध्ये अनेक सोलापूरकरांची फसवणूक झाली होती.
पैसे डबल आणि ट्रिपल होण्याच्या अपेक्षेने अनेक गुंतवणूकदारांनी या ॲपमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवला होता. याप्रकरणी राम जाधव यांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.सोलापूर येथील न्यायालयातून या आधी संशयित आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला होता.सोलापूर आर्थिक गुन्हे शाखा मोठ्या प्रमाणावर याचा तपास करत आहे.
जामिनीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार..
संशयित आरोपींच्या अटकपूर्व जामिनीसाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे आरोपींचे वकील ऍड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी सांगितले.