Breaking |भरधाव टेम्पोने वाहतूक पोलिसाला उडवले ; जागीच मृत्यू

0

वरवडे /माढा
वाहुतुक पोलिसाला टोल नाक्यावर ड्युटी बजावत असताना भरधाव जाणाऱ्या टेम्पोने चिरडल्याने वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे पोलीस नाईक सागर चोबे असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.


सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सदर दुर्घटना घडली. वरवडे टोल नाक्यावर पुणे येथे जाणाऱ्या अतिशय वेगात असणाऱ्या टेम्पो क्रमांक MH 04 HD 0170 हा हैद्राबादहुन मुंबई च्या दिशेने औषधे घेऊन निघाला असता पोलीस नाईक चोबे यांनी हात करून थांबविण्याचा प्रयत्न केला .मात्र या टेम्पोने चोबे यांना चिरडले ही घटना आज रविवारी दि.6 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली.

टेम्पो चालक

टेम्पो चालक नवनाथ शिवाजी गुट्टे (रा. परळी, वैजनाथ बीड ) याला अटक करण्यात आली आहे. कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here