मोफत शिबीर | कृष्णामाई हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी हाडांची ठिसुळता तपासणी ; जाणून घ्या ..

0

सोलापूर, (प्रतिनिधी)ः- बदलत्या जीवनशैलीमध्ये महिलांमध्ये हाडांचे विकार वाढत आहेत त्याच अनुषंगाने कृष्णामाई नर्सिंग होम आणि नवजीवन फर्टिलिटी अँन्ड आयव्हीएफ सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दि. 16 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत  किल्ला बागेसमोरील कृष्णामाई नर्सिंग होम मध्ये महिलांसाठी मोफत हाडांची ठिसुळता तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांचे आरोग्य चांगले आणि सदृढ राहावे यासाठी योग्य आहार आणि व्यायाम केला पाहिजे परंतु आजच्या जीवनशैलीत महिलां स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यातून अनेक व्याधी सुरू होतात. हाडामधील कॅल्शीयम चे प्रमाण कमी होवून हाडे कमजोर होऊन ठिसूळ होतात. महिलांमध्ये हाडांची ठिसुळता अधिक वाढत आहे. त्यामुळेच याची जनजागृती व्हावी आणि  योग्य आणि वेळेत उपचार मिळावेत म्हणून मुलीं तसेच महिलांसाठी कृष्णामाई नर्सिंग होमच्या 28 व्या आणि नवजीवन फर्टिलिटी अँन्ड आयव्हीएफ सेंटरच्या 20 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिला व मुलींसाठी मोफत हाडांची ठिसुळता तपासणी शिबीर सोमवार दि. 16 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत किल्ला बागेसमोरील कृष्णामाई नर्सिंग होम मध्ये करण्यात येणार आहे.

सोलापूर मधील तज्ञ आणि गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवेत असलेले डॉ. राजीव दबडे, डॉ.माधुरी दबडे, डॉ. बाहुबली दोशी, डॉ.गिरीष कुमठेकर आणि डॉ. सुप्रिया बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने हाडांची तपासणी या शिबीरात होणार असून सोलापूर शहर जिल्ह्यातील महिला व मुलींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here