भाजयुमो प्रदेश सचिवपदी समर्थ बंडे यांची निवड

0

सोलापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी सोलापूरचे समर्थ रविंद्र बंडे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आले.

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे हा कार्यक्रम झाला. समर्थ बंडे यांनी यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. भारतीय जनता युवा मोर्चामध्ये सक्रिय सहभागानंतर त्यांच्याकडे भाजयुमो सोलापूर जिल्हा ग्रामीण प्रभारी आणि भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशी जबाबदारी होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाने त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश सचिव अशी नवीन जबाबदारी सोपवली आहे. या पदावर काम करताना भाजयुमोसाठी व महाराष्ट्रातील युवा पिढीसाठी भरीव अशी कामगिरी करण्याचा संकल्प असल्याचे श्री. बंडे यांनी सांगितले.

भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी समर्थ बंडे यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या निवडीवेळी प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, राहुल लोणीकर, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here