गोटेवाडी येथे वृक्षारोपण करून साजरा केला वाढदिवस

0

वाघोली(प्रतिनिधी)

मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथील विकास सोसायटीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते बबलू देवकते यांच्या वाढदिवसानिमित्त गोटेवाडी येथे लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण व मास्क वाटप करून सामाजिक कार्याने वाढदिवस साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल मोरे,उद्योजक प्रशांत बापू भोसले,कालिदास गावडे योगेश कवेकर,अजय जाधव, हनुमंत पाटील,अनिल देवकते,ब्रह्मदेव खांडेकर,शत्रुघ्न खांडेकर,सिद्धू रोटे, महेश शेंडगे,सचिन तरंगे,संतोष वाघमोडे,जगु कोकरे, कैलास हराळे,अतुल होनमाने,नितीन सलगर,सुदाम तरंगे,सोन्या लवटे,बापू नरळे,सोपान कापसे,
महावीर रोटे,संकेत पांढरे सुखदेव कांबळे, वैजीनाथ माने,चिमू चौगुले, पांडूरंग शिंदे,देवा हांडे,लक्ष्मण खांडेकर,बाबू जगताप, सोमा देवकते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सामाजिक कार्याने वाढदिवसाचा उपक्रम स्तुत्य

कोरोना सारख्या महामारी च्या काळामध्ये वाढदिवस साजरा करताना मास्क वाटप,वृक्षारोपण,रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या होमिओपॅथिक अर्सनिक अल्बम गोळ्या वाटप तसेच कोरोना मध्ये झटणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करून बबलू देवकते या कार्यकर्त्यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला असून हे समाजासाठी आदर्शवत व स्तुत्य असे आहे.

-बाळराजे पाटील
चेअरमन, लोकनेते शुगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here