मोठी बातमी | ‘लालपरी’ एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात धावणार …

0

MH13 News Network 

देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे.या पार्श्वभूमीवर देशभरात आणि पर्यायाने राज्यात अनलॉकचे नियम हळूहळू शिथिल होत आहेत .आज बुधवारी  राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी फक्त एसटी बस साठी असणार आहे. जिल्ह्याबाहेर एसटी बस सेवा सुरू होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.सर्वसामान्याची लालपरी धावणार असल्याने थांबलेले अर्थचक्र सुरु होण्यास मदत मिळणार आहे.

कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आणि बस सेवा थांबवण्यात आली. त्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी आतुरलेले अनेक चाकरमानी शहरात अडकून बसले. हक्काची लालपरी बंद असल्याने लोकांचे मोठे हाल झाले. मात्र आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी बस सेवेला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ई पासही गरज नसेल. मात्र खासगी चारचाकी वाहनांसाठी मात्र ई पास आवश्यक असणार आहे.
दरम्यान, लॉकडाउन काळात बस सेवा बंद राहिल्याने एसटी महामंडळाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर अतिरिक्त एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेल पंप सुरू करीत आहे अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली.
सह्याद्री येथे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मंगळवारी एस टी महामंडळ आणि इंडियन ऑइल यांच्या सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर तीन ठिकाणी पेट्रोल डिझेल पंप आणि पाच ठिकाणी एल एन जी पंप इंडियन ऑइल माध्यमातून  बांधण्यात येणार असून त्याचे संचालन आणि नियंत्रण एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here