मोठी बातमी : कर्जदारांना मोठा दिलासा ; ३ महिने मुदत वाढवली

0

MH13 NEWS Network

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने आज शुक्रवारी पुन्हा कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे
आणखीन जून, जुलै,ऑगस्ट या तीन महिन्यांसाठी कर्जवसुलीस स्थगिती देण्यात आली आहे अशी माहिती आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास यांनी केली. यापूर्वीही आरबीआयने मार्च, एप्रिल ,मे महिन्याच्या कर्ज वसुलीस स्थगिती दिली होती.

यामुळे कर्ज न भरण्याची मुदत आरबीआयने आणखी तीन महिने वाढवली आहे. आरबीआयच्या या घोषणेचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे.कर्जाची सवलत आणखी तीन महिन्यांना वाढवली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत होता आणि सगळ्यांना हीच अपेक्षा लागून राहिलेली होती. याचसंदर्भातली चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू होती. तीच महत्त्वाची घोषणा आज आरबीआयने केली आहे.

सर्वसामान्यांच्या हातात पैसा रहावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसंच येणाऱ्या मान्सूनकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी सांगितलं.
कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी आरबीआयने पुन्हा मोठे निर्णय घेतले आहेत. रेपो दरात आरबीआयने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 4.40 टक्कांवर असलेला रेपो रेट आता 4.0 टक्क्यांवर आला आहे. रेपो रेट कपातीमुळे कर्जावरचं व्याज आणखी कमी होणार आहे.
तसंच रिव्हर्स रेपो दरात देखील आरबीआयने पुन्हा 40 बेसिस पॉइंटची कपात केली आहे. त्यामुळे आता रिव्हर्स रेपो दर कमी होऊन 3. 35 टक्के झाला आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने हे मोठं पाऊल उचललं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here