मोठी बातमी : राज्यातील प्रमुख पालख्यांसह आषाढी यात्रा होणारच !

0

पंढरपूर : जगभरासह महाराष्ट्रात देखील ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मागील महिलांमध्ये होणारे चैत्री यात्रा सोहळा रद्द करण्यात आला होता,  परंतु पुढे येणाऱ्या आषाढी यात्रेच करायचं काय या संदर्भात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पदाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आहे. या बैठकीत आषाढी यात्रा सोहळा भरवण्याचे ठरले आहे.

वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधीत्व ७ संत करतात असं म्हटलं जातं म्हणून निदान सगळ्या वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधित्व म्हणून सात संतांच्या पालख्या तरी पंढरपुरात याव्यात ही अपेक्षा वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळींची आहे. त्यानुसार सात पालख्या आपापल्या वेळेला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. या पंढरपुरात नवमीपर्यंत येतील. 

त्या येताना प्रत्येक पालखीचं नियोजन हे सरकारच्या नियमात आणि शासनाने घालून दिलेल्या अटीत होईल. असे वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख मानकरी हभप राणा महाराज वासकर यांनी सांगितले.

या आहेत प्रमुख पालख्या

-श्री संत ज्ञानेश्वर महाराज
-श्री संत तुकाराम महाराज
-श्री संत निवृत्ती महाराज
-श्री संत सोपान काका महाराज
-श्री संत मुक्ताई महाराज
-श्री संत एकनाथ महाराज
-श्री संत निळोबाराय महाराज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here