BIG BREAKING … तर कोण मायका लाल निवडून कसा येतो ते पाहतोच – अजित पवार

0

MH13 NEWS NETWORK:

राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यास मुदत वाढवून देण्यास नकार देत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली, यानंतर भाजपाने सुद्धा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होत. दरम्यान काल काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दिवसभर बोलणी सुरु होती मात्र अंतिम तोडगा निघू शकला नाही. आज वाय बी सेंटर येथे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक सुरु आहे.

तत्पुर्वी बैठकीला जाणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला, भाजप सरकार स्थापन करू शकेल का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले “महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास कोणी मायका लाल उभारला तरी निवडून येऊ शकणार नाही. जर एखादा आमदार फुटला तर त्याठिकाणी पोटनिवडणुकीला आम्ही मिळून एकच उमेदवार देउ.” शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही, पुढे जाऊन अडचण निर्माण होण्यापेक्षा सर्व गोष्टींवर अगोदरच सविस्तर बोलणी करत असल्याने थोडा जास्त वेळ जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here