बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

0

MH13 News Network 

बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी तातडीने नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.काल शनिवारी रात्री उशिरा अमिताभ यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे. काळजीचं कारण नसल्याचे डॉक्टरांचे स्पष्टीकरण आहे. महापालिकेचे अधिकारी बच्चन यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेत आहेत.

दरम्यान, अभिषेक बच्चन याचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून ऐश्वर्या ,आराध्या आणि जया बच्चन यांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. अभिषेक बच्चन यालाही रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या तरी अमिताभ यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

ऐश्वर्या, जया निगेटिव्ह : रेखाच्या सुरक्षा रक्षकास कोरोना

दरम्यान अभिनेत्री रेखा हिच्या बंगल्यात सुरक्षा रक्षकासही कोरोना पॉझिटिव्ह झाला असून बंगला सील करण्यात आला आहे. रेखा हिच्या बंगल्यावर दोन सुरक्षा रक्षक आहेत, त्यापैकी एकास कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई महापालिका आरोग्य विभागाने हा बंगला सील केला असून बंगल्याचा परिसर प्रतिबंधात्मक परिसर जाहीर केला आहे. ग्रॅड एन्ट्री बॉलिवूड मधील या दिग्गज कुटुंबातील सदस्य यांना झाल्याने मोठी खळबळ उडालीआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here