विवेकानंद केंद्र ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स प्रकल्पाचे येत्या ७ मे रोजी भूमिपूजन

0

सोलापूर (प्रतिनिधी) : विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या सोलापूर शाखेच्या वतीने नेहमीच विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्या उपक्रमाला स्थिर स्वरुप देण्यासाठी विवेकानंद केंद्राच्यावतीने ‘विवेकानंद केंद्र ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स’ प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. येत्या ७ मे म्हणजेच रोजी सकाळी ८.३० वाजता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीचे भुमीपूजन सोहळा पार पडणार असल्याची माहिती प्रकल्पाचे प्रमुख सुहास देशपांडे आणि प्रकल्पाचे सीईओ सुनील कुलकर्णी यांनी दिली.
जुळे सोलापुरातील प्रणव नगरी, बॉम्बे पार्क येथे हा प्रकल्प आकारास येणार आहे. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. बालकृष्णनजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. विवेकानंद केंद्र ही संस्था मनुष्य निर्माण आणि राष्ट्रपुनरूत्थान या ध्येयाने देशभरात कार्यरत आहे. शिक्षण, योग, साहित्य प्रसार, ग्रामविकास, पर्यावरण, आंतरराष्ट्रीय विषयांचे संशोधन, संस्कृती संवर्धन यांसह विविध क्षेत्रांमध्ये ८६० शाखा आणि ६५ शाळांच्या माध्यमातून काम चालू आहे.
‘योग एक जीवन पद्धती’ या संकल्पनेला आधार मानून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. सर्वांना योगाच्या माध्यमातून अधिक गुणवत्तापूर्ण जीवन कसे जगता येईल यावर संशोधन करणारी आणि प्रशिक्षण देणारी संस्था सोलापूर आणि महाराष्ट्रात असावी या उद्देशाने विवेकानंद केंद्रातर्फे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

प्रकाल्पाचे ध्येय :
योग एक जीवनपद्धती या संकल्पनेवर आधारीत मनुष्यातील क्षमता, प्राविण्य, उत्कृष्टता व पुर्णत्वाचा विकास करणे.

प्रकल्पाचे कार्य उद्दिष्ट –
एकत्वाच्या विचारावर आधारीत आणि योग एक जीवनपद्धती या संकल्पनेच्या माध्यमातून मनुष्यातील क्षमता, प्राविण्य, उत्कृष्ठता व
पुर्णत्वाचा विकास करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्ती व समूहाला प्रशिक्षण देणे होय.

नियोजित उपक्रम :
१. योग प्रतिमान
अ) परीक्षा देऊया हसत खेळत – शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी
आ) समर्थ – शिक्षकांसाठी
इ) सहयोग – नवविवाहित दांपत्यासाठी
ई) स्वानंद – अधिका-यांसाठी
उ) मातृत्व योग – गरोदर महिलांसाठी
२. शाळा व अन्य प्रशासकीय संस्थांसाठी प्रशिक्षण
३. उद्योग विश्वातील आवश्यकतेनुसार समूह प्रशिक्षण
४. योग विषयाचे संशोधन आणि परिसंवाद, परिषद व व्याख्याने

सोलपुरसह महाराष्ट्राच्या विविध स्तरातून या प्रकल्पास लोक सहभाग वाढत आहे. या भूमी पूजनास सोलापुरातील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्पाचे संचालक दीपक पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here