आपण यांना पाहिलंत का.? बेपत्ता मुलीचा शोध घेण्याचे आवाहन

0

MH13 News Network

सोलापूर शहरातील बाळे भागातील मुलगी बेपत्ता असून तिचा शोध घेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी यांनी जनतेला केले आहे.

यासंदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाणे बेपत्ता रजिस्टर नंबर 65/2021 दिनांक 10 जुलै 2021 रोजी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

यात हकीकत अशी की यातील बेपत्ता मुलीचे नाव पायल ज्ञानेश्वर जाधव असून वय 21, राजेश्वरी नगर बाळे, उत्तर सोलापूर येथे वास्तव्याला आहे.

पायल जाधव दिनांक 05/07/2021 रोजी मध्यरात्री 12 ते 2 च्या सुमारास घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेली आहे.अशी माहिती देण्यात आलेली आहे.

पायल जाताना घरातील दागिने व रोख रक्कम 20 हजार रुपये घेऊन गेलेली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

वर्णन..

रंग गोरा असून घरातून जाताना केशरी टॉप व पिवळी पॅन्ट परिधान केलेली होती. रंग गोरा असून उंची पाच फूट दोन इंच आहे, डोळे बारीक तर नाक सरळ असून बांधा मध्यम आहे. मुलीस मराठी व हिंदी भाषा येते.

या बेपत्ता मुलीची कोणास माहिती मिळाल्यास फौजदार चावडी पोलीस स्टेशन संपर्क साधावा असे आवाहन S.S. मंद्रुपकर, पोलीस उपनिरीक्षक यांनी जनतेस केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here