बना ‘कोव्हिड वाॅरिअर्स’ अन् द्या पोलिसांना ‘साथ’…अशा प्रकारे..!

0

MH13 NEWS Network 

कोरोना विषाणुचा (कोव्हिड-19) सोलापूर शहर व ग्रामीण भागात होत असलेल्या प्रादुर्भावच्या अनुषंगाने, सोलापूर ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात लाॅकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणेकरीता सोलापूर ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीकरीता प्रत्येक गावामध्ये स्वयंस्पुर्ती विनामोबदला काम करण्यास इच्छुक असणा-या स्वयंसेवकांची (कोव्हिड वाॅरिअर्स) निवड करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचीत केले आहे.
कोव्हिड वाॅरिअर्सच्या निवडीचे निकष:-
1. RSP/NSS/MSW/D.Ed/B.Ed./महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थी.
2. BSF/Army/CRPF/CISF मधून सेवानिवृत्त झालेले.
3. गावातील भौगोलिक/सामाजिक माहिती असलेले.
4. मजबुत शरीरयष्टी, निरोगी व 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेले.
5. त्यांचेविरूध्द गुन्हे दाखल नसलेले, समाजात वर्तन चांगले असलेले व सामाजिक कामाची आवड असलेले.
6. कोव्हिड वाॅरिअर्स हे पुर्णपणे स्वयंसेवक आहेत त्यामुळे त्यांना कोणताही मोबदला किंवा इतर प्रकारचे सवलती देण्यात येणार नाही.
वरील निकषावर काम करण्यास इच्छूक असणाÚया व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचीत केले आहे.
कोव्हिड वाॅरिअर्सची कर्तव्ये:-
1. ज्या-त्या पोलीस ठाणेस त्यांना नेमुण दिलेल्या ठिकाणी कामकाज करतील.
2. गावामध्ये नव्याने बाहेर गावाहून येणारे लोकांची माहिती पोलीस ठाणेस कळवतील.
3. गावामध्ये कोरोना विषाणुचे आजाराच्या अनुशंगाने लक्षणे दिसणारे लोकांची माहिती पोलीस ठाणेस देतील. परंतु, सदर लोकांचे समक्ष जावून कोणीही तपासणी करणार नाही.
4. पोलीस ठाणे/पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना एखादया पिडीत व गरजू कुटुंबाकडून अत्यावष्यक वस्तूंची मागणी आल्यास संबंधितांना आवष्यक ते साहित्य त्यांचे कुटुंबापर्यंत घरपोच करण्याचे कामकाज करतील.
5. पोलीसांच्या मार्गदर्षनाखाली कामकाज करून पोलीसांना त्यांचे कामात मदत करतील.
कोव्हिड वाॅरिअर्स यांना कोरोना विषाणु बाबत माहिती, काम करीत असताना स्वच्छता व सुरक्षतेच्या बाबत काळजी घेणे, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील डाॅक्टर यांचेकडून प्रषिक्षण देण्यात येणार असून, प्रषिक्षण देताना सोषल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. जे कोव्हिड वाॅरिअर्स हे उत्तम कामकाज करतील अषा कोव्हिड वाॅरिअर्स यांना मा. पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांचे कडून त्यांनी केलेल्या कामाबद्दल प्रषस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तरी ज्या व्यक्तींना विनामोबदला सामाजिक कार्य करण्याची आवड आहे, अषा व्यक्तींनी ते राहत असलेल्या संबंधित पोलीस ठाणेस संपर्क साधावा असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री. मनोज पाटील व मा. अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री. अतुल झेंडे यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयाकडील नागरीकांना याद्वारे केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here