बॅक ऑफ इंडियाचा SME आऊटरिच प्रोग्राम यशस्वी ; उद्योजक, व्यवसायायिकांचा लक्षणीय सहभाग

0

सोलापूर, (प्रतिनिधी):- कोरोनाच्या महामारीनंतर उद्योग आणि उद्योजकांना नवी उभारी देण्यासाठी बॅक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एसएमई आऊटरिच प्रोग्राम मध्ये विविध उद्योजक, व्यवसायायिकांनी सहभाग नोंदवत लाभ घेतला. बॅकेचे जनरल मॅनेंजर मुकुंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम शनिवार दि. 4 सप्टेंबर रोजी हॉटेल प्रथम मधील हॉलमध्ये पार पडला.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना मुळे सर्वचस्तरातील उद्योग व्यवसायिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे व्यवहार बंद करण्याची वेळ प्रत्येकावर आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नवनवीन उद्योग आणि उद्योजकांना मदतीचा हात कसा देता येईल यासाठी बँक ऑफ इंडिया सोलापूर विभागाच्या वतीने एसएमई आऊटरिच प्रोग्राम घेण्यात आला त्यामध्ये सोलापूर, पंढरपूर, लातूर या परिसरातील छोटे छोटे उद्योजक, कारखानदार, व्यवसायिक, सीए यांना निमंत्रित करण्यात आले होते.


या कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक मुख्य व्यवस्थापक जयंत केसकर यांनी बँक ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. योजनांचे सादरीकरण केले. बँक ऑफ इंडिया उद्योजक आणि व्यवसायिकांना कशा प्रकारे मदत करणार आहे याची सविस्तर माहितीही त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला आलेले प्रमुख पाहुणे कोठारी उद्योग समूहाचे प्रमुख उज्वल कोठारी यांनी बँकेकडून उद्योजकांना कशा प्रकारे मदत पाहिजे असते त्याबाबत काही सूचना केल्या. तर उपस्थित उद्योजक, व्यवसायिकांनी आपल्या अडचणी मांडल्या.

त्यावर बँक ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक मुकुंद कुलकर्णी आणि बँक ऑफ इंडियाचे सोलापूर विभागाचे मुख्य व्यवस्थापक लग्नजीत दास यांनी उपस्थित सर्व उद्योजक व्यवसायिकांच्या अडचणी जाणून त्यांच्या शंकाचे निरसन केले आणि बँकेकडून सर्वतोपरी मदत व्यवसायिक आणि उद्योजकांना मिळणार असल्याचे आश्वासन दिले. एसएमईच्या माध्यमातून सरकार आणि बँक ऑफ इंडिया यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सर्व योजनांबाबतही यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली. बँक ऑफ इंडियाशी नवनवीन उद्योजक आणि व्यवसायिक जोडले जावेत त्यामधून त्यांचा आर्थिक विकास व्हावा याच उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उद्योजक आणि व्यवसायिकांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here