शिवसेनेने कधीच जातीयतेचे राजकारण केले नाही ;डॉ. शिवरत्न शेटे

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त वह्या वाटप

0

By-MH13 NEWS,वेब/टीम

शिवसेनेने 80 टक्के समाजकारण आणि केवळ 20 टक्के राजकारण करून नेहमीच मराठी माणूस आणि मराठीची अस्मिता जोपासत सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि करत आहे. शिवसेनेने कधीच जातीयता पाळली नाही आणि जातीचे राजकारण केले नाही. असे उद्गार प्रख्यात शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी काढले.
हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान खडक गल्ली बाळे ,अतुल राजे भवर मित्र परिवार यांच्यावतीने युवा सेनेचे जिल्हा सचिव बाबासाहेब भवर यांच्या नेतृत्वाखाली लहान मुलांना वह्या वाटप करण्यात आले. याप्रसंगी व्याख्यानात डॉ.शिवरत्न शेटे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक श्रावण भवर,शिवसेनेचे जेष्ठ नेते पुरूषोत्तम बरडे,नगरसेवक अमोल बापू शिंदे,नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर,शहर प्रमुख हरीभाऊ चौगूले अतुल राजे भवर. संभाजी भोसले,सुनिल भोसले,खंडू सलगर,बापू वाडेकर,जितू वाघमारे,रवि कोळी तमाम शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.
प्रारंभी बाबासाहेब भवर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी पुरुषोत्तम बरडे, गुरुशांत धुतरगावकर ,अमोल शिंदे, हरिभाऊ चौगुले, तसेच अतुल राजे भवर यांची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबा सावंत यांनी केले. या कार्यक्रमास बाळे ,केगाव, कोडी, खेड ,माळकवठे भंडारकवठे यासह शहरातील शिवसैनिक, युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here