बॅक ऑफ इंडियाने ए्नस्पोच्या माध्यमातून सर्वसामान्याचा आर्थिकस्तर उंचावला – रमेशचंद्र ठाकूर

0

प्रॉपर्टी ए्नस्पोमध्ये पहिल्याच दिवशी 20 जणांना जागेवर कर्ज मंजुरी
सोलापूर, (प्रतिनिधी):- बॅक ऑफ इंडियाने सोलापूरमध्ये प्रथमच प्रॉपर्टी आणि ऑटो ए्नस्पोचे आयोजन करून सर्वसामान्यांपर्यत आर्थिक उन्नतीचा मार्ग पाहोचवला त्यातूनच सर्वसामान्यांचा आर्थिकस्तर उंचावत आहे असे प्रतिपादन बॅक ऑफ इंडियाचे पश्चिम विभागाचे मुख्यप्रबंधक रमेशचंद ठाकूर यांनी केले. बॅक ऑफ इंडिया सोलापूर विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवशीय प्रॉपर्टी आणि ऑटो ए्नस्पोचे आयोजन नॉर्थकोट येथे केले होते त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपस्थित होते.
प्रत्येकाचे स्वत:चे घर व्हावे हे स्वप्न असते त्यातून सरकारही प्रयत्न करीत आहे आता बॅक ऑफ इंडियानेही एक पाऊल पुढे टाकून घर आणि गाडी घेणाऱ्या प्रत्येकाला तात्काळ कर्ज मंजुर करून देण्याचे काम केले आहे. यातून समाजातील सर्वसामान्य घटकांची आर्थिक उन्नती होते असेही रमेशचंद्र ठाकूर यांनी सांगितले.बॅक ऑफ इंडियाने देशात मोठे नेटवर्क उभे केले आहे त्यातून कोट्यावधीचा व्यवसाय होत आहे अनेकांना मदतीचा हातही दिला आहे. असेही रमेशचंद्र ठाकूर यांनी सांगितले.


बॅक ऑफ इंडियाने पुढाकार घेवून कर्ज उपलब्ध केले आणि लोकांना सोय करून दिली त्यातून आता घर आणि गाडी घेण्यासाठीची मोठी आर्थिक अडचण दूर झाली आहे असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.
सरकारकडून आणि बॅक ऑफ इंडियाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ लोकांनी घ्यावा आपले हक्काचे घरव्हावे हे स्वप्न प्रत्येकाचे असते ते स्वप्न बॅक ऑफ इंडियाने पूर्ण करण्यास मदत करीत आहे असे सेवानिवृत्त सोलापूर झोनल महाप्रबंधक प्रदीप कांबळे यांनी सांगितले.


प्रारंभी सोलापूर विभागाचे महाप्रबंधक अजय कडू यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सोलापूर विभागाच्या वतीने बॅक ऑफ इंडियाने सोलापूर शहर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक कारखानदार यांना अनेक योजनामधून मदतीचा हात दिला आहे त्याचबरोबर एकाच ठिकाणी घर, गाडी आणि ते घेण्यासाठी कर्ज मिळावे म्हणून या प्रॉपर्टी ए्नस्पोचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा लाभ अनेकांनी घेतला आहे असे अजय कडू यांनी सांगितले.
सोलापूरकरांनी बॅक ऑफ इंडियाच्या प्रॉपर्टी ए्नस्पोमधून घर आणि गाडी खरेदी करावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आपल्या भाषणातून सोलापूर विभागाचे उपमहाप्रबंधक शैलेशचंद्र ओझा यांनी केले.


प्रारंभी बॅक ऑफ इंडियाच्या या प्रॉपर्टी आणि ऑटो ए्नस्पोच्या स्टॉल्सचे पश्चिम विभागाचे महाप्रबंधक रमेशचंद्र ठाकूर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सुरूवात झाली. यावेळी सेवानिवृत्त महाप्रबंधक प्रदीप कांबळे, सोलापूर विभागाचे महाप्रबंधक अजय कडू, उपमहाप्रबंधक शैलेशचंद्र ओझा, मुकुंद कुलकर्णी, रामचंद्र पवार, व्यवस्थापक सचिन कुमार, घनश्याम गुलेच्छा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या ए्नस्पोमध्ये पहिल्याच दिवशी घर आणि गाडी घेणाऱ्या 20 जणांना कर्ज मंजुरी केल्याचे पत्र तातडीने देण्यात आले. या ए्नस्पोमध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील नामांकित 40 बिल्डर्स डेव्हलपर्स आणि 15 वाहन विक्रेत्यांनी आपले स्टॉल्स लावले होते. ग्राहकांनीही मोठ्याप्रमाणात या ए्नस्पोमध्ये सहभाग घेतला होता. रविवार दि. 16 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेपर्यत हा ए्नस्पो सर्वांसाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी या ए्नस्पोला भेट द्यावे असे आवाहन यावेळी व्यवस्थापक सचिनकुमार, घनश्याम गुलेच्छा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here