लोणीकरांची जीभ घसरली; ‘त्या’वक्तव्याचा निषेध

0

MH13NEWS Network

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महिला तहसिलदार अधिकाऱ्याबाबत वापरलेल्या शब्दांचा निषेध करणारे निवेदन महसूल अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सोमवारी देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील, शैलेश सुर्यवंशी, अरुणा गायकवाड, मोहिनी चव्हाण, स्नेहल भोसले, तहसिलदार डी.एस. कुंभार, शुभांगी  गोंजारी आदी उपस्थित होते.

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महिला तहसीलदाराबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यावरुन विरोधकांनी लोणीकरांकर टीका केली आहे.तहसीलदार संघटनेच्या अध्यक्षांनी लोणीकरांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची एका जाहीर कार्यक्रमात बोलताना जीभ घसरली. शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी हिरोईन आणू, असं वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केलं,इतकंच नाही तर त्यानंतर त्यांनी स्टेजवर बसलेल्या तहसीलदार या हिरोईनसारख्याच दिसतात, असं म्हटलं. लोणीकरांच्या भाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर गावातील एका जाहीर कार्यक्रमात बबनराव लोणीकर बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here