शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या श्रावणीला मिळाले सुवर्ण पदक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आयोजित बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयातील कु.श्रावणी उदय महाजन हिने कायचिकित्सा या विषयात 249 गुण घेऊन विद्यापीठात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सर्व विषयाचे मिळुन 847 गुण घेऊन चतुर्थ क्रमांक मिळविला आहे.
तिच्या या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद दोशी, सचिव डॉ. प्रदीप कोठाडिया, सहसचिव डॉ.आदर्श मेहता, प्राचार्या डॉ.वीणा जावळे, उपप्राचार्य डॉ.शांतिनाथ बागेवाडी, प्रशासकीय अधिकारी श्री. अनुप दोशी आदींनी कौतुक करून तिचे अभिनंदन केले.
तिच्या या यशात कायचिकित्सा विभागप्रमुख डॉ.विवेक चांदुरकर व सर्व विभागप्रमुख, अध्यापक, कर्मचारी, पालक यांचे ही मार्गदर्शन लाभले त्याबद्ल त्यांचेही अभिनंदन केले.
या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.