ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांना अध्यात्म रत्न पुरस्कार प्रदान

0

MH13 NEWS NETWORK : 

सोलापूरचे प्रसिद्धी कीर्तनकार ह. भ.प सुधाकर महाराज इंगळे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते अध्यात्म रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि भारत अस्मिता फाऊंडेशन च्या वतीने आयोजित 9 वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान समारंभ एमआयटी युनिव्हर्सिटी च्या कोथरुड कॅम्पस मध्ये पार पडला, यावेळी हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात महापौर मुरलीधर मोहोळ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, अध्यक्ष डॉ. सुरेश घैसास, प्रख्यात संगणक तज्ज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, कार्याध्यक्ष राहुल कराड, डॉ. मंगेश कराड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी विष्णुपंत केरु गायखे (पळसे, ता. जिल्हा नाशिक) यांना कृषीरत्न पुरस्कार, कुशावर्ता चंद्रशेखर बेळे(देवणी, जिल्हा लातूर) यांना समाजरत्न पुरस्कार (लातूर), डॉ. संदीप मनोहर डोळे (नारायणगाव, जिल्हा पुणे) यांना आरोग्यरत्न पुरस्कार, सुधीर बाळासाहेब खाडे (नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद) यांना शिक्षणरत्न पुरस्कार, ऋचा राहुल धापेश्वर (पुणे) यांना क्रीडारत्न पुरस्कार, सरपंच पुरुषोत्तम अंबादास घोगरे (खिरगव्हाण, जिल्हा अमरावती) यांना ग्रामरत्न पुरस्कार तर बचतगट रत्न पुरस्कार पूजा नितीन खडसे (धुळे) यांना, तसेच जनजागरण रत्न पुरस्कार जयप्रकाश आसाराम दगडे (लातूर) यांना तर ह. भ. प.सुधाकर महाराज इंगळे (सोलापूर) यांना अध्यात्म रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी ‘राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार नवरत्न परिचय’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here