जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक सोडतीबाबत हरकती आहेत का .?

0

सोलापूर,: राज्य निवडणूक आयोगाच्या दि.22 जुलै 2022 रोजीच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- 2022 साठी 28 जुलै 2022 रोजी निवडणूक विभाग आरक्षण व निर्वाचक गणाची सोडत प्रक्रिया पार पडलेली आहे.

 

प्रारूप आरक्षण परिशिष्ट- 24 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हापरिषद यांच्या नोटीस बोर्ड व संकेतस्थळ तसेच सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आले आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग आरक्षणाबाबत हरकती व सूचना असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय (ग्रामपंचायत निवडणूक शाखा) व निर्वाचक गणाबाबत हरकती व सूचना असल्यास त्या संबंधित तहसील कार्यालयात दि.29 जुलै 2022 ते 2 ऑगस्ट 2022 (कार्यालयीन वेळेत) या कालावधीत सादर करता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here