अन्.. सोलापुरात सुरु झाली ‘लाईट’आपगिरी ; तोडा तुम्ही…जोडू आम्ही…वाचा सविस्तर

0
लाईट आपगिरी

MH13 NEWS Network

कोरोना काळात रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था, सर्वसामान्यांचं मोडलेलं कंबरडे, यात वाढीव वीज बिलाची भर पडली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड वैतागलेला असून यामध्येच महावितरणकडून वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम जोरात सुरू झालेली आहे. त्यावर सोलापुरातील आप पक्षाच्यावतीने ‘लाईट’ आपगिरी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तोडा तुम्ही जोडू आम्ही !अभियान राबवून ज्या सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन तोडले आहेत त्यांना पुन्हा जोडून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

वीज बिल न भरलेल्या नागरिकांचे विद्युत  पुरवठा खंडीत करू नका अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने महावितरण अभियंता चंद्रकांत दिघे यांना दिले होते निवेदन दिले. मात्र तरी सुद्धा महावितरण कडून नागरिकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत.त्यामुळे  आप च्या वतीने गोदूताई परुळेकर येथील वसाहत मध्ये नागरिकांचे तोडलेले कनेक्शन जोडून दिले. तुम्ही वीज कनेक्शन तोडला तर आम्ही जोडू असा इशाराही आमच्या वतीने देण्यात आला.

वीज

 

दरम्यान, गोदूताई बिडी घरकुल येथून बऱ्याच नागरिकांचे फोन आम आदमी पार्टी ला प्राप्त झाले ज्यात महावितरण कडून लेखी १५ दिवसांची नोटीस न देता त्यांच्या घरच्या वीज तोडण्यात आल्याच्या तक्रारी मिळाल्या. आम आदमी पार्टी चे शहर अध्यक्ष मो. अस्लम शेख ह्यांनी सदर नागरिकांना भेटून समस्या जाणून घेतल्या. वीज तोडणी बेकायदेशीर असल्या कारणाने स्वतः ती विजे चे तयार जोडून वीज पुरवठा पूर्ववत केला. जमुना बलराम आडम ह्या विधवा महिलेचे वीज बिल फक्त रु ४०५० थकीत होते तरी देखील त्यांचे वीज खंडित करण्यात आले होते. त्यानंतर वीज कनेक्शन जोडून देण्यात आले.

विद्युत कायदा सन २००३ चे सेकशन नं ५६ नुसार लेखी, पूर्ण १५ दिवसांची नोटीस देऊनच वीज खंडित करण्याची प्रक्रिया करण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टी अशा विद्युत खंडित झालेल्या नागरिकांचे वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत करेल. तसेच विद्युत पुरवठा खंडित करण्यास येत असलेल्या वीज कर्मचारी व अधिकारी ह्यांच्या घरां समोर बोंबाबोंब आंदोलन करेल असा इशारा शहराध्यक्ष अस्लम शेख यांनी दिला.

ह्या वेळी आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष मो. अस्लम शेख, रॉबर्ट गौडेर, नासिर मंगलगिरी, निहाल किरनळ्ळी,असिफ शेख आदी उपस्थित होते.

 

टप्प्याटप्प्याने वीज बिलची करा सोय…

वीज खंडित करण्याचे कार्य तत्काळ थांविण्यात यावे. सरकार कडून आदेश होई पर्यंत कोरोना लॉकडाऊन काळातील वीज बिल भरण्यास तगादा लावू नये व लॉकडाऊन च्या नंतर चे वीज बिल अदा करण्यासाठी बिन व्याजी व सोयीस्कर हप्ते / टप्प्या टप्प्याने मध्ये बिल अदा करण्याची सोय करण्यात यावी.

अस्लम शेख, शहराध्यक्ष, 

आम आदमी पार्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here