Breaking ! शुक्रवारी माढा शहरात 14 रूग्णाची वाढ

0

शेखर म्हेत्रे /माढा प्रतिनिधी:

माढा शहरात आज 14 रूग्ण वाढल्याने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे काल आढळून आलेल्या 3 रुग्णांच्या संपर्कातील एकूण 29 जणांची रॅपिड अॅटिजन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये एकूण 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने माढ्यासह परिसरात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 9 पुरुष ,5 स्त्री रुग्णांचा समावेश आहे.

यामध्ये साठे गल्ली, शिवाजीनगर , शुक्रवार पेठ, तेली गल्ली , हॉटेल सावली या परिसरातील रूग्ण असल्याची माहिती मिळाली आहे .सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याच बरोबर माढा तालुक्यासह माढा शहरात कोरोना विषाणूने पाय रोवल्याचे दिसुन येत आहे. माढा शहरातील पहिले 4 आणि आजचे 14 असे एकुण 18 रूग्ण संख्या झाली आहे. या आधीचे 4 रूग्ण बरे होऊन घरी परतले असले तरी आज शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही 18 वर गेली आहे. यांच्यावर कुर्डुवाडी येथील कोविड सेंटर व इतर खाजगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. 14 जणांची कोरोना रिपोर्ट पाॅजिटिव्ह आल्याचे माढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सदानंद होनकळस यांनी सांगितले.

माढा शहरात 14 रूग्णांची वाढ झाल्याने माढा तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या 209 वर पोहचली तर मृत्यू संख्या 6 झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here