जप्त केलेल्या गाड्या सोडून देण्यास सुरूवात; पोलीसांनी केलं असं आवाहन

0

MH13 NEWS NETWORK

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोकाट फिरणाऱ्यांवर त्यांच्या वाहनाची जप्तीची कारवाई करण्यात आली होती. लॉकडाऊन काळात जप्त केलेली वाहने सोडून देण्यास सोलापूर वाहतूक शाखेच्या वतीने सुरुवात झाली आहे. काल यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी आदेश काढला होता. आज मंगळवारी सकाळी नॉर्थकोट परिसरात जप्त करून ठेवलेली वाहने शहर पोलिस वाहतूक शाखेच्या वतीने सोडण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलिसांनी  नागरिकांनी अनावश्यक फिरू नये असे आवाहन केले.

सद्यस्थितीत सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 1000 पर्यंत पोहोचत आहे. तर मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या शंभर इतकी होत आहे. संसर्ग वाढत असताना नागरिकांनी अनावश्यक फिरू नये. राहण्याचे ठिकाण एका बाजूला तर वस्तू आणण्यासाठी शहरातील दुसऱ्या टोकाला जाऊन खरेदी करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे हे चुकीचे आहे. आपापल्या भागामध्ये किराणा दुकान, मेडिकल, दुधाची दुकाने असताना निष्कारण इकडून तिकडे फिरू नये. दुचाकी वाहनावर फक्त चालकच असला पाहिजे. सायकलीचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा संतोष काणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here