भीषण अपघात : आळंद येथील दुर्दैवी घटनेत सोलापुरातील पाच जण ठार,चार जण जखमी

कोर्सेगाव, चिंचपूर येथील गावावर शोककळा

0

by-MH13News,network

सहकुटुंब देवदर्शन करून मूळ गावी परतणाऱ्या सोलापुरातील भाविकांवर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात पाच जण ठार झाले तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गुलबर्गा ते आळंद त्या मार्गावर झाला. अपघातात ठार झालेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर आणि अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव येथील रहिवासी आहेत.
अपघातामध्ये संजय अशोक चडचणे वय वर्षे 33, राणी संजय चडचणे वय 28, श्रेयस संजय चडचणे वय तीन वर्ष हे तिघे राहणार चिंचपूर तालुका दक्षिण सोलापूर हे अपघातात ठार झाले आहेत. तर शिवराज संजय चडचण वय सहा वर्ष राहणार चिंचपूर हा जखमी झाला आहे.

तर भीमाशंकर आळगी वय 27 रा कोर्सेगाव हा अपघातात जखमी झाला असून त्यांची पत्नी भाग्यश्री आळगी या मयत पावले आहेत. तर हत्तरसंग संगणा यांचे पत्नी (शीतल)गुब्यवा संगन्ना हत्तरसंग जखमी झाल्या आहेत, तर धीरज संगन्ना हत्तरसंग वय दोन वर्ष हा मृत झाला आहे, हे हत्तरसग हे चिंचपूरचे रहिवासी आहेत.

गेल्या बुधवारी हे सर्वजण श्रावण महिन्यानिमित्त दक्षिण भारताच्या देवदर्शनासाठी प्रवासाला गेले होते. श्रीशैलम रामेश्वरम तिरुपती बालाजी सह इतर देवांचे दर्शन घेऊन काल रात्री कलबुर्गी येथील शरण बसवेश्वरांचे दर्शन घेऊन निघाले होते .कलबुर्गी वरून निघताना आळंद जवळ हा दुर्दैवी अपघात झाला.
देवदर्शन करून येताना आळंद जवळ स्कार्पिओ गाडी ने समोरील ट्रकवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. यात जखमी भीमाशंकर आळगी राहणार कोर्सेगाव यांचे गेल्या मे महिन्यामध्ये लग्न झाले होते.केवळ ४ महिन्यानंतर झालेल्या अपघातात भीमाशंकर हा जखमी झाला असून त्यांची पत्नी भाग्यश्री यांचे निधन झाले.
या अपघातामुळे कोर्सेगाव, चिंचपूर येथील गावावर शोककळा पसरले असून अत्यंत शोकाकुल वातावरणात मंगळवारी सायंकाळी मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here