‘जान हैं तो जहान हैं’; खिलाडी अक्षय कुमारने दिली 25 कोटींची मदत

0

MH13NEWS Network

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महामारीशी लढा करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बॉलिवूडचा सबसे बडा खिलाडी अक्षय कुमारने तब्बल पंचवीस कोटीची मदत पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये देण्याची घोषणा केली आहे.

ट्विटरवर पोस्ट शेअर करत अक्षय कुमार म्हणाले की सध्या प्रत्येकाचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्याला जमेल तेवढी मदत करायला हवी. मीदेखील माझ्या बचती मधून 25 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा करत आहे. चला वाचवूया जीवन कारण जान है तो जहान है असे ट्विटर वरील पोस्ट वर लिहिले आहे.

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. मोठे उद्योजक, खेळाडू आणि कलाकार देश वाचवण्यासाठी मदत करत आहेत. त्या निधीमध्ये देशवासीयांनी आपले आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here