बाळे भागात हर घर तिरंगा अभियानात नागरिकांचा उस्फुर्त सहभाग

0

भारत देश माझा महान
तिरंगा आहे त्याची शान !

प्रभाग 5 बाळे परिसरामध्ये माजी  गटनेते आनंद चंदनशिवे, माजी  नगरसेवक गणेश पुजारी यांच्या वतीने हर घर तिरंगा अभियान साजरा करण्याकरिता जनजगृती करण्यात आली व घरोघरी तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले.


या अनुषंगाने आज जय हनुमान तरुण मंडळाच्या वतीने. बाळे भागातील माजी सैनिक श्री. फाल्गुन पुजारी, श्री जीवनराव पाटील, श्री सुर्यकांत पुजारी, श्री अप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ध्वज फडकविण्यात आला. हर घर तिरंगा या अभियानात परिसरातील नागरिकांनी उस्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here