Action | आठ घरफोड्या,8 लाखांचे सोने चोरणाऱ्यास ठोकल्या बेड्या

0
सोलापुर – भरदिवसा अपार्टमेंट मधील बंद फ्लॅट चे कुलूप तोडून घरफोडी करून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेलरोड पोलिसांनी शिताफीने अटक केला आहे.त्याच्याकडून 8 घरफोड्या उघड करुन 8 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापूर गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी केली असून दाखल गुन्ह्यामध्ये काहीएक पुरावा नसताना कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल केल्यामुळे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की..
जेल रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील एक महिन्यापासून अपार्टमेंटमधील दिवसा बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.त्या अनुषंगाने तपास करीत असता बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आरोपी हा अशोक सराफ बाजारामध्ये सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार लावलेल्या सापळामध्ये संशयित आरोपी आनंद कृष्णाहरी कोडम वय 45 रा.वज्रेश्वरी नगर , सादुल पेट्रोल पंपाच्या मागे , अक्कलकोट रोड सोलापूर हा मिळून आला.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे झुमके मिळून आले.याबाबत त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने जेलरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये सात तर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अशा एकूण आठ घरफोडी केल्याची माहिती दिली.आठ घरफोड्या मधील 22.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची कॅश आरोपींकडून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here