“आचार्य अत्रे : विनोदकारांची प्रेरणा ; हास्यकवी बंडा जोशी येणार सोलापुरात

0

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा सोलापूरच्या वतीने हा कार्यक्रम अत्रेभक्त कै. वा. गो. काटकर यांच्या कुटुंबीयांच्या सहयोगाने  आचार्य अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला असून प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात हास्यकवी बंडा जोशी हे उपस्थित राहाणार आहेत.

आचार्य अत्रे विनोदकारांची प्रेरणा”  या विषय बंडा जोशी यांच्या हास्यकवितांनी सोलापूरकरांना हास्य- विनोदाची मेजवानी मिळणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक- १३ ऑगस्ट २०२२ रोजी सायं. ६ वाजता वा. का. किर्लोस्कर सभागृह, हि. ने. वाचनालय, सोलापूर येथे संपन्न होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तरी साहित्यरसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष किशोर चंडक व  प्रमुख कार्यवाह मारुती कटकधोंड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here