सोलापुरातील सेवानिवृत्त सहायक फौजदार अब्दुल करीम मुजावर (वय 70) यांचे आज रविवारी दि.22 मे रोजी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.
मुजावर हे धार्मिक ,मनमिळावू आणि विनोदी स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ते सदर बाजार पोलीस स्टेशनचे हवालदार समीर मुजावर व राजीव प्राथमिक शाळा बाळे येथील शिक्षक अब्दुल कादर मुजावर यांचे वडील होत
उद्या सोमवार दिनांक 23/05/2022 रोजी सकाळी 9.00 वाजता समीर मुजावर, गजानन नगर,सहारा मल्टिपर्पज हॉल, सोलापूर यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघून जडेसाब बंगला, अक्कलकोट रोड पाणी टाकी, सोलापूर. येथे दफन विधी करण्यात येईल. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.