आबा कांबळे खून खटला : गामा पैलवानसह सात आरोपींचा जामीन फेटाळला

0

MH13 NEWS Network 

सोलापूरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी आबा कांबळे खून प्रकरणातील आरोपी सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे, रविराज शिंदे, अभिजित उर्फ गणेश शिंदे, निलेश महामुनी, प्रशांत शिंदे, तौसिफ विजापुरे,विनीत खानोरे यांचा जमिनीचा अर्ज फेटाळून लावला आहे .
या सर्व आरोपीविरुद्ध ipc 302,120ब,143 ते 149,तसेच इतर अपराधा नुसार फोजदार चावडी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असून न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे.
सदर आरोपी पळून जाण्याची दाट शक्यता आहे.तसेच high power committe चा निर्णय या खटल्यास लागू पडत नसल्याचे उच्च न्यायालयाचे निकाल मध्ये सांगितले असल्याचे दर्शवून दिले. सदर सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपुत यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून कोर्टाने सर्व सातही आरोपींचा जामिनीचा अर्ज फेटाळून लावला आहे.
या सर्व आरोपींनी कट रचून आबा उर्फ सत्यवान कांबळे याचा सोलापुरातील नवी पेठ येथे दि 7।7।2018 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कोयत्याने मारून खून केला होता.

यावर आरोपीने युक्तिवाद केला की आरोपी गामा पैलवान हा 74 वर्षाच वयस्कर असून त्याला डोळ्याला दिसत नाही तसेच त्याला इतरही आजार असल्याचे नमूद करून त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचार घेणे जरुरीचे आहे आणि इतर आरोपींनी गुन्हा केला नसल्याचे सांगून त्यांना खोटेपणाने खुनाच्या अपुराधात गोवल्याचं सांगितले.

दरम्यान ,सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांना या पूर्वीच्या खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झाली आहे या प्रकरणाची सुनावणी सुरू असून नेत्र साक्षीदारांची साक्ष अद्याप झालेले नाही मूर्त आबा कांबळे याच्या अंगावर 50 पेक्षा जास्त आहेत आरोपींनी संगनमताने कट असून कांबळे चा खून केला असून आरोपीची ओळख परेड झाली आहे पंच साक्षीदारांनी आरोपीला न्यायालयात ओळखले आहे असा युक्तिवाद ऍड.राजपूत यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here