महाराष्ट्र दिन | ‘आप’ सदस्य नोंदणी अभियान व नवमतदार नोंदणी अभियान

0

1 मे  जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन याचा औचित्य साधून आम आदमी पार्टी कडून सोलापूर येथे प्रभाग क्रमांक 25 भारती विद्यापीठ जुळे सोलापूर येथील इच्छुक उमेदवार श्री विनायक शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणी अभियान व नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.रुद्रप्पा बिराजदार व निलेश संगेपांग यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या अभियानात जुळे सोलापूर भागातील आप चे कार्यकर्ते मा.राजश्री पवार आणि श्रीनिवास शावणे ,आदित्य मुद्गुल , वैष्णवी पवार व सर्व जुळे सोलापूर भागातील सहकारी उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाला पार्टी कडून सोलापूर जिल्हा सचिव रुद्रप्पा बिराजदार , प्रभाग क्रमांक 28 चे उमेदवार मलिकाअर्जुन पिलगीरे,सायकलवीर निलेश संगेपांग हे उपस्थीत होते.

निलेश संगेपांग व मल्लीकर्जून पिंलगिरि यांचे भाषण झाले ,माननीय रुद्रप्पा बिराजदार यांनी जुळे सोलापूर भागातील नागरिकांना व कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणी अभियान व नवीन मतदार नोंदणी अभियान याचे महत्त्व भाषणाद्वारे सांगितले .नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री विनायक शिवाजी पवार यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here