धक्कादायक | सांगोलातील ‘या’ कारागृहात 25 कैदी कोरोणा पॉझिटिव्ह

0

Mh13news Network

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सांगोला येथील दुय्यम कारागृहातील 60 पैकी तब्बल 25 कैदी तपासणीत कोरोना पॉझिटिव आढळून आले. कोरोनाबाधित 25 कैद्यांवर कमलापूर येथील सिंहगड कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

सांगोला येथील दुय्यम कारागृहातील विविध गुन्ह्यात बंदी असलेल्या 60 पैकी 8 कैदी दिनांक 7 मे रोजी दुपारी अचानक त्रास होऊ लागल्याने सांगोला ग्रामीण रुग्णालयात त्यांची तपासणी केली. यामध्ये तिघेजण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे उर्वरित 52 कैद्यांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये 22 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण कोरोनाबाधितांची  संख्या 25 झाली आहेत. अशी धक्कादायक वृत्त समोर आली.

अशीच एक घटना 27 मार्च रोजी याच कारागृहात घडली. त्यावेळी 24 कैदी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यावेळी मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, तहसीलदार अभिजीत पाटील, डॉ. उत्तम फुले, यांनी कारागृहाला भेट देऊन सर्व कैद्यांची तपासणी करून घेतली होती. त्यानंतर दीड महिन्याने पुन्हा याच करागृहातील 25 कैदी पॉझिटिव्ह सापडल्याने कैद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धक्कादायक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here