प्रगतशील शेतकऱ्यांच्या घरात केलेली चोरी उघडकीस; आरोपी ताब्यात

0
Crime

Mh13news Network

केवड येथील एका प्रगतिशील शेतकऱ्याच्या घरातून ७ लाख ९९ हजारांचे दागिने पळविणाऱ्या कामगाराला माढा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरलेला ऐवजही जप्त केला आहे.

विजय घुले असे संशयित आरोपीचे नाव असून, याबाबत प्रगतिशील शेतकरी मनोहर सुभाष पाडुळे यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिली होती.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार –

दि. २३ आणि २४ एप्रिल या दोन दिवसात पाडुळे यांच्या घरातून संशयिताने दागिने पळविले होते. पोलिसांनी १५ दिवस तपास चालविला. दरम्यान, हे दागिने कामगारानेच पळविल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी संशयित आरोपी विजय घुले यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ लाख ५५ हजारांची सोन्याची चेन, १ लाख ६५ हजारांची सोन्याची चेन,९० हजारांचे ब्रेसलेट, १ लाख ८९ हजार किमतीच्या ९ अंगठ्या, रोख लाख रुपये असा ऐवज जप्त केला.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, मोहम्मद शेख, आझर शेख, बालाजी घोरपडे, अनिकेत मोरे, चंद्रकांत गोरे, सागर कौलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here