लसीकरण | आजच 7 ते 8 दरम्यान ऑनलाइन नोंदणी 18 ते 44 वयोगटासाठी

0

Mh13news Network

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सर्व आरोग्य केंद्रावरती 45 वर्षा पुढील लोकांसाठी लसीकरण सुरू असून शासनाकडून वेळोवेळी लस महापालिकेकडे उपलब्ध होतात पण 45 वर्षापुढील लोकांसाठी शासना कडून अद्याप लस उपलब्ध न झाल्याने 45 पुढील लसीकरण उद्या करण्यात येणार नाही. पण 18 ते 44 वर्षाच्या लोकांसाठी महापालिकेकडे सद्या 2500 डोस लस उपलब्ध असल्याने विशेष करून 10 मे 2021 रोजी एक दिवसासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या 18 नागरी आरोग्य केंद्रावरती लस दिली जाणार आहे.

त्यासाठी आज 9 मे 2021 रोजी सायंकाळी 7 ते 8 या दरम्यान रजिस्ट्रेशन करण्यासाठी साईट उपलब्ध करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आज ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे आणि उद्या लसीकरण केंद्रावरती येथे लसीकरणासाठी यावे आणि ज्यांचं केवळ रजिस्ट्रेशन झालेला आहे त्यांनीच आरोग्य केंद्रावरती लसीसाठी यावेत ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही त्यांनी लसीकरण केंद्र जवळ येऊ नये याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

उद्या सर्व लसीकरण केंद्रवरती फक्त 18 ते 44वयोगटातील ऑनलाइन केलेल्या नागरिकांनासाठी लस उपलब्ध आहे.तसेच 45 वर्षाच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र सुरू राहणार नाही याची नोंद घ्यावी .ज्यावेळी शासनाकडून लस उपलब्ध होईल त्यावेळी प्रसार माध्यमं त्याद्वारे नागरिकांना कळवण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली.

या साइटवर रजिस्ट्रेशन

http://Cowin.Gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here