शहर | आज बरे झाले 287; तर नवे बाधित 131

0

Mh13news Network

सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे आज एकाच दिवशी 131 जणांची नोंद घेण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 287 जण बरे झाले परंतु मृत्यूचे थैमान थांबत नसून 7 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे.

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात आज रविवारी दि.9 मे रोजी कोरोनाचे नवे 131 रुग्ण आढळले असून यामध्ये 81 पुरुष तर 50 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 1665 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1268 निगेटीव्ह तर 131 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 287 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here