आज साहित्याची वारी गोरोबांच्या दारी!

आजपासून 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

0

“आली साहित्याची वारी गोरोबांच्या दारी” अस ब्रीद घेऊन आजपासून 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. यंदाच्या संमेलन आयोजनाचा मान संत गोरोबांच्या उस्मानाबादला मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्या वतीने हे 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. नियोजित संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, उद्घाटक ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, साहित्य संमेलनाचे निमंत्रक नितीन तावडे यांच्यासह अनेक साहित्यिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे. गोरोबा काकांच्या साहित्य नगरीत उभारला ‘गोरोबा काकांच्या घराचा देखावा’ यावर्षीच्या साहित्य नगरीचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

संत गोरोबा यांच्या रूपाने उस्मानाबाद जिल्ह्याला लाभलेला संत परंपरेचा दैदिप्यमान वारसा आहे. संत गोरोबा यांचे मूळ गाव तेर हे उस्मानाबादच्या प्राचीन इतिहासाचा वैभवशाली वारसा लाभलेलं गाव. गोरोबांचे साहित्य निर्मितीतील योगदान स्मरणात ठेवून साहित्य संमेलन नगरीला गोरोबांचे नाव देण्यात आले आहे. संमेलनस्थळी गोरोबांच्या घराचा देखावा तयार करण्यात आला आहे, हा सजीव देखावा सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here