ग्रामीण | नव्याने 92 जण ‘पॉझिटिव्ह’ तर ‘या’ भागातील तिघांचा मृत्यू…

0
corona update

MH13 News Network
आज मंगळवारी दि.15 डिसेंबर रोजी ग्रामीण भागातील 92 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 58 पुरुष तर 34 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 128 आहे. यामध्ये पुरुष 83 तर 45 महिलांचा समावेश होतो . आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 3181 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3089 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 37 हजार 071 इतकी झाली आहे. यामध्ये 22967 पुरुष तर 14104 महिला आहेत.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1092 जणांचा मृत्यू झाला आहे यात 787 पुरुष तर 305 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 995 आहे .यामध्ये 795 पुरुष तर 200 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 34 हजार 984 यामध्ये 21385 पुरुष तर 13599 महिलांचा समावेश होतो.

या भागातील तिघांचा मृत्यू…

सोलापूर जिल्हा परिसरातील आंबेचिंचोली, तालुका पंढरपूर येथील 58 वर्षांची स्त्री, पंढरपूर तालुक्यातील गादेगाव भागातील 56 वर्षांचे पुरुष तर माळशिरस येथील 75 वर्षांचे पुरुष यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 4

बार्शी –नागरी 9 तर ग्रामीण 3

करमाळा –नागरी 3 ग्रामीण 6

माढा – नागरी 2 तर ग्रामीण 5

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 8

मंगळवेढा – नागरी 2 ग्रामीण 12

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 1

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

पंढरपूर – नागरी 5 ग्रामीण 14

सांगोला – नागरी 6 ग्रामीण 4

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 7

आजच्या नोंदी नुसार नागरी -27 तर ग्रामीण भागात 65 असे एकूण 92 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here