82 आकडेवारी खोटी ; सोलापुरात एकूण 68 पॉझिटिव्ह, सहा मृत…

0

MH13 NEWS Network 

सोलापुरात कोरोनाग्रस्तांची संख्या 68 असून त्यापैकी   सहाजणांचा मृत्यू झाला आहे आणि काल दिलेली हीच आकडेवारी खरी आहे. दरम्यान सोलापुरात कोरोना पॉझिटीव्ह ८२ असल्याचे एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रम या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य शासनाच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आलेली आकडेवारी चुकीची असून संबंधित विभागाला आकडेवारी दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

सोलापुरात कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू वाढत चालले आहे. 12 तारखेला एक रुग्ण असणाऱ्या सोलापुरात आता 68 कोरोनाग्रस्ताची संख्या झाली आहे. दरम्यान बुधवारी  एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रमाकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत सोलापूर शहरात ७५ आणि ग्रामीण भागात ७ असे ८२ रुग्ण दाखवण्यात आले आहेत. व ५ जण मरण पावले अशी नोंद आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 82 वर  गेल्याची  चर्चा सुरू होती. काही राजकारणी मंडळींनी ही फेसबुक, व्हाट्सअप, सोशल मीडियावर आकडेवारी टाकली होती. त्यामुळे सोलापूर शहरात व ग्रामीण भागात भीतीचे व संभ्रमाचे वातावरण पसरले होते.

सोलापूर शहरात ७५ आणि ग्रामीण भागात ७ असे ८२ रुग्ण दाखवण्यात आले आहेत. व ५ जण मरण पावले अशी नोंद एकात्मिक रोग सर्व्हेक्षण मध्ये आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 82 वर  गेल्याची  चर्चा सोशल मीडियावर सूरु आहे. नागरिक पोलीस, जिल्हा प्रशासन,  फोन करून विचारपूस करीत आहेत. दरम्यान मिलिंद शंभरकर यांनी ही आकडेवारी खोटी असल्याचे सांगितले. सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६८ असून त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित ६२ जणांवर सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. हीच  आकडेवारी खरी असल्याचे स्पष्ट केले. वेगवेगळ्या आकडेवारीमुळे प्रशासनात योग्य समन्वय आहे का नाही? अशी संमिश्र चर्चा सोलापूरकरांमध्ये सुरू आहे.

हे आकडे चुकीचे असून सोलापुरात कोरोनाचे ६८ रुग्ण आहेत. मी काल मंगळवारी जाहीर केलेली आकडेवारी बरोबर आहे,  आरोग्य विभागाने दिलेली आकडेवारी चुकली आहे. मी आरोग्य विभागाच्या संचालिका अर्चना पाटील यांच्याशी बोललो आहे. अर्ध्या तासात हे आकडे दुरुस्त करण्याचे त्यांनी मला सांगितले आहे. 

मिलिंद शंभरकर ,जिल्हाधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here