धक्कादायक | ग्रामीण भागात काळ थांबेना; आज 42 जणांचा मृत्यू

0

Mh13news Network

आज दि.7 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1966 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

आज शुक्रवारी 7 मे रोजी ग्रामीण भागातील 1966 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 1198 पुरुष तर 768 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1308 आहे. यामध्ये 774 पुरुष तर 534 महिलांचा समावेश होतो. आज 42 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 7068 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 5102 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here