एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा

0

Mh13news Network

महाराष्ट्र शासना मध्ये एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन सुरु असून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने एसटी कामगार कर्मचार्‍यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. एसटी महामंडळ ही लोक वाहिनी म्हणून सर्व परिचित असून आशिया खंडातील सर्वात मोठी प्रवासी दळणवळणाचे एकमेव साधन आहे 1950 रोजी स्थापन झालेले हे महामंडळ नगर ते पुणे प्रवासी घेऊन 35 बस गाड्या व शंभर कर्मचारी होते. आज 285 डेपो 1 लाख 15 हजार कर्मचारी व 16 हजार बसेस इतका विस्तार झालेला आहे.

एसटी कर्मचारी काबाडकष्ट करून आपल्या जीवाची पर्वा न करता एसटी महामंडळ टिकवून ठेवले आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी असून महामंडळ प्रशासन एमडी साहेब व परिवहन मंत्री यांनी कामगारांच्या प्रश्नाकडे डोळेझाक केल्याने आजपर्यंत 37 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे या कामगारांना शासनात समाविष्ट करून न्याय द्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड भविष्यात रस्त्यावर येऊन आंदोलन उभा करेल असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, शहर कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शहर उपाध्यक्ष सीताराम बाबर शहर उपाध्यक्ष नागेश पवार, प्रशांत गायकवाड, सिद्धाराम सुतार, अली नाईकवाडी, मल्लिकार्जुन अकसर, सुलेमान पिरजादे, बसवराज आळगे, इत्यादी सह बहुसंख्य एसटी कामगार उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here