आज 6 बळींची नोंद ; सांगोल्यातील व्यक्तीचा समावेश

0

कोरोनाचा कहर वाढत असून सहा जणांचा बळी गेल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली यामध्ये पाच पुरुष असून एका महिलेचा समावेश आहे

सोलापूरात गेल्या 24 तासात कोरोना बाधितांची संख्या वाढून ती 516 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत 5353 रूग्णांची कोरोना चाचणी झाली यात 5194 अहवाल प्राप्त झाले. यात 4678 निगेटिव्ह तर 516 पॉझिटिव्ह अहवाल आहेत तर अजून 159 अहवाल प्रतिक्षेत आहेत.

आज पर्यंत बाधित रुग्ण असलेल्या मृतांची संख्या 40 वर पोहोचली असून यात 26 पुरूष आणि 14 महिलांचा समावेश आहे.

आज नोंद करण्यात आलेल्या मृत्यू पावलेल्या व्यक्ती
आज मयत झालेली व्यक्ती 64 वर्षीय पुरूष असून ते पाचेगांव, सांगोला परिसरातील आहेत. 18 मे रोजी दुपारी एकच्या दरम्यान त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 20 मे रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांचे निधन झाले.

दुसरी व्यक्ती कुर्बान हुसेन नगर येथील 58 वर्षीय पुरूष आहेत. यांनाही 18 मे रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 21 मे रोजी दुपारी चार वाजून चार मिनिटांनी त्यांचे निधन झाले.

तिसरी व्यक्ती तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील 72 वर्षीय पुरूष आहेत. त्यांना 17 मे रोजी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 21 मे रोजी रात्री आठ वाजता त्यांचे निधन झाले.

तर चौथी व्यक्ती देगांव रोड परिसर ,सलगरवस्ती येथील 55 वर्षीय पुरूष आहे. यांना 18 मे रोजी दुपारी बारा वाजून 18 मिनिटांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते.उपचारादरम्यान 20 मे रोजी रात्री साडेसात वाजता त्यांचे निधन झाले.

पाचवी व्यक्ती मराठा वस्ती भवानी पेठ येथील 58 वर्षीय महिला आहे. 16 मे रोजी त्या स्वतःहून मार्कंडेय रुग्णालय मध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या. उपचारादरम्यान 20 मे रोजी रात्री दहा वाजता त्यांचे निधन झाले.

तर सहावी व्यक्ती जुळे सोलापूर,सिध्देश्वर नगर येथील 46 वर्षीय पुरूष आहेत. 14 मे रोजी कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल,ग्रामीण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान 21 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता निधन झाले. मृत पावलेल्या सर्वांचे कोव्हिड 19 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here