ग्रामीण | आज बरे झाले 1273; तर नवे बाधित 1841

0

Mh13news Network

आज दि.4 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1841 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

आज मंगळवारी 4 मे रोजी ग्रामीण भागातील 1841 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 1092 पुरुष तर 749 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1273 आहे. यामध्ये 747 पुरुष तर 526 महिलांचा समावेश होतो. आज 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 9134 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 7353 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here