पक्ष संघटना वाढवण्याची मदार चार जिल्हाप्रमुखांवर

0

MH13 NEWS NETWORK:

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून सोलापूर जिल्ह्यासाठी चार जिल्हाप्रमुख देत असल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून समजते आहे. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी विधानसभा मतदार संघानुसार जिल्हाप्रमुख देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभा मतदार संघानुसार जिल्हाप्रमुख:
पुरुषोत्तम बरडे (मतदारसंघ – सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट),
धनंजय डिकोळे ( मतदारसंघ – करमाळा, माढा),
संभाजी शिंदे ( मतदारसंघ – पंढरपूर, सांगोला, माळशिरस),
गणेश वानकर ( मतदारसंघ – बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, मंगळवेढा)

पक्षसंघटनेत व पदांच्या रचनेत यापुढेही मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here