दिलासादायक | कोरोना रुग्णांपेक्षा, बरे होण्याचे प्रमाण जास्त…

0

Mh13news Network

सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे आज एकाच दिवशी 178 जणांची नोंद घेण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 401 जण बरे झाले परंतु मृत्यूचे थैमान थांबत नसून 18 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे.

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात आज मंगळवारी दि.4 मे रोजी कोरोनाचे नवे 178 रुग्ण आढळले असून यामध्ये 104 पुरुष तर 74 महिलांचा समावेश आहे.

आज एकूण 2686 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 2518 निगेटीव्ह तर 178 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 401 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 18 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here