5 TMC पाणी पेटलं ! सात तासांनंतर जलसमाधी आंदोलन मागे

0

Mh13news Network

पालकमंत्र्यांनी उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी याच्या निषेधार्थ पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन केले. या कार्यकर्त्यांना उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी 7 मे रोजी सोलापूर येथे बैठक लावण्याची लेखी पत्र दिले. त्यानंतर सात तास चाललेल्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी नेल्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी जनहित संघटनेचे देशमुख व शेतकरी नेते अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उजनी धरणाच्या यशवंत जलाशयात उतरून शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या काळात जलसमाधी आंदोलन केले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवूनही आंदोलन करते कार्यकर्ते पोलिसांना चकवा देऊन पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन चालू केले होते. पोलिसांनी वारंवार विनंती करूनही आंदोलन करते पाण्याबाहेर येत नव्हते. शेवटी पोलिसांना पाण्यात उड्या माराव्या लागल्या? आंदोलनकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी तीन-चार बोटीही कार्यकर्त्या भोवती लावण्यात आल्या होत्या, यावेळी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, व जनहितचे भय्या देशमुख यांच्या चकमक झाली.आंदोलन सुमारे सहा तास चालले होते.

उजनीत जलसमाधी आंदोलन केल्याबद्दल 14 कार्यकर्त्यांवर गुन्हे –

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी नेल्याचे निषेधार्थ उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी उजनी जलाशय समाधीत आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या 14 कार्यकर्त्यांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनहित संघटनेचे प्रभाकर देशमुख शेतकरी नेते अतुल खूपसे, माऊली हळणवर, दत्ताभाऊ व्यवहारे, विठ्ठल मस्के, अण्णासाहेब जाधव,किरण भांगे, बापू मिटकरी, धनाजी गडदे ,बळीराम गायकवाड ,जयप्रकाश मोरे ,औदुंबर गायकवाड ,अभिजीत पाटील, या चौदा कार्यकर्त्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून जमाव जमवून शासन विरोधात घोषणाबाजी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उजनी जलाशयात उजनी गावाजवळील उस्मानाबाद पाणी पुरवठा केंद्राजवळ जलसमाधी आंदोलन केले होते. पुढील तपास हवालदार स्वामीनाथ लोंढे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here