धक्कादायक | बार्शीत ‘तीन’च दिवसात 418 कोरोना बाधित रुग्ण

0

Mh13news Network

बार्शी शहर व तालुक्यात कोरोना परिषद निवड सुरूच आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढत आहे. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी या तीन दिवसात तब्बल 418 कोरोना रुग्णांची वाढ नोंदवली गेली आहे. या तीन दिवसात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. याच रविवारी एकाच दिवशी झालेल्या 7 जणांचा मृत्यूचा समावेश आहे.

यामध्ये बार्शी शहरात 111 तर ग्रामीण भागात 307 रुग्ण आहेत. अशी माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक ढगे यांनी दिली. तीन दिवसात 5687 जणांच्या रॅपिड व rt-pcr चाचण्या केल्या आहेत.

शहरात 2724 तर ग्रामीण भागात 2963 चाचण्या केल्या. 403 जण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत.
बार्शी हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांची संख्याही जास्त आहे. आता डेडिकेटेड केअर सेंटर आणि हॉस्पिटलची संख्यादेखील वाढत आहे. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा मागील आठवड्यात प्रमाणे जाणवत नाही. ही एक जमेची बाजू आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा मात्र सुरूच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here